दिनांक ३ मे १९३६ रोजी नागपूर म्युनिसीपालिटीच्या मानपत्र समारंभानंतर संध्याकाळी नागपूरच्या अस्पृश्य बांधवांची जाहीर सभा कस्तुरचंद पार्कमध्ये झाली. यावेळी हजारो अस्पृश्य बंधुभगिनी हजर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराने नागपूर शहर हादरून गेले होते. डॉक्टर साहेबांवर नथीतून तीर मारणारे टीकाकार व पुढारी नागपुरातून कुठे निघून गेले होते, त्यांचा पत्ता नव्हता. डॉक्टरसाहेबांच्या प्रेमामुळे, त्यांच्यावरील पूर्ण विश्वासामुळे सर्वस्वाला विसरून कार्य करण्याला सज्ज झालेला […]

