निळा झेंडा काढू नका ही विनंती केली म्हणून ४० जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत या संतापजनक प्रकराचा ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करतो.
![]() |
| श्रीधर भीमराव मांदळे यांना पोलीस प्रशासनाने दिलेलं नोटीस. |
निळा झेंडा काढण्यासाठी १४४ धारा लागू करण्यात आली होती.
निळा झेंडा काढण्यासाठी १४४ धारा लागू!लातूर जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणेचा जाहीर निषेध!!#लातूर जिल्ह्यातील साकोळा, तालुका शिरूर अनंतपाळ येथील हा गंभीर प्रकार समोर आला आहे. भिमाकोरेगाव शॉर्य दिनी ०१ जानेवारी २०२१ रोजी आंबेडकरी अनुयायांनी साकोळा येथील चौकात निळा झेंडा लावला तेव्हापासून गावात तणावाचे वातावरण आहे. याच गावात इतर झेंडे अनेक आहेत ते अतिक्रमण नसतं परन्तु फक्त निळा झेंडा अतिक्रमण असतो. अतिक्रमणाचा नावाखाली येते कोंबिंगची धमकी दिली गेली. अखेर ०३/०२/२०२१ ला हा झेंडा फोर्स लावून काढण्याचा डाव रचलेला आहे. आंबेडकरी अनुयायी दहशतीखाली आहेत. त्यांच्या हातात धमकीचे १४४ चं पत्र टेकून दिलं आहे.विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सदाशिव भिंगे जे अपघातात दगावले त्यांनी आयुष्यातील शेवटचं आंदोलन हा झेंडा उभा रहावा म्हणून केलं होतं येते आता भावना जुडलेल्या आहेत . गावात सर्व झेंडे चालतात मग निळा झेंडाच का चालत नाही? जिल्हा परीषदेची ही जागा परवानगी देऊन जिल्हा अधिकाऱ्यांनी झेंडा नियमित केला तर सामाजिक सलोखा राहील परन्तु शांतता कमिटी हा खेळ फक्त आमच्यासाठीच आहे.पुरोगामी म्हणणाऱ्या सरकारने उत्तर दिले पाहिजे की, एका गावात निळा झेंडा सोडून सर्व रंगांचे झेंडे असतात ते अतिक्रमित नाहीत परंतु निळाच कसा काय? अतिक्रमित…ऑल इंडिया पँथर सेना या नोटीसचा निषेध करते नी झेंडा काढू नये अशी मागणी करत आहे. लातूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीने साकोळा येते तात्काळ भेट देऊन संघर्ष उभा करून येतील झेंडा वाचवावा. प्रशासनाला आमचं आवाहन आहे काढायचे असतील तर सर्वच झेंडे काढा उगाच जातीय भावनेतून हे कृत्य करू नका.जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ परवानगी देऊन झेंडा कायम फडकू द्यावा अन्यथा राज्यभर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. समाज बांधवांना धमकवण्याचा प्रयत्न करू नका. १४४ धारा लावून दहशत निर्माण करू नका विश्वासात घ्याल तर प्रश्न मार्गी लागेल अन्यथा अस्तित्वाचा लढा सुरू होईल.
– दीपकदादा केदार (ऑल इंडिया पँथर सेना) यांच्या फेसबुक वरून
– रिपब्लिकन चळवळ टीम


